देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून यात आता पर्यंत कित्येक लोकांचा बळी गेला आहे.....
टेलिव्हिजन आणि बॉलिवूडवरही त्याचा खूप मोठा परिणाम पहायला मिळाला....महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम जाहीर झाल्यानंतर तातडीने अनेक हिंदी मालिका शूटिंगसाठी परराज्यात गेल्या आहेत. यात जयपूर, गोवा, हैदराबाद आदी ठिकाणी सेट शिफ्ट केलेहिंदी मालिकांनी उत्तर प्रदेशमधूनही रेड कारपेट अंथरल्याची चर्चा होती.... नवा कंटेंट दाखवण्याची गरज लक्षात घेऊन अनेक मालिकांनी परराज्यात जाणं पसंत केलं आहे. मराठी वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या अनेक मालिकेचे सेट हैदराबाद, गोवा इथे शूटिंगसाठी पोहोचल्या आहेत. हैदराबादमध्ये रामोजी फिल्मसिटी हा त्यासाठी उत्तम पर्याय असल्याचं इंडस्ट्रीला वाटतं आहे.
रामोजीमध्ये सर्वप्रकारच्या सुविधा मनोरंजनसृष्टीला एकाच ठिकाणी मिळतात. तिथे कलाकारांची राहायचीही सोय चांगल्याप्रकारे होते....सगळं एकाच ठिकाणी असल्यामुळे निर्मात्यांना आणि सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांनाही ते सोयीचं पडतं, हैदराबादमध्ये कोठारे व्हिजन्सच्या काही मालिका जाणार आहेत. कोठारे व्हिजनचे आदिनाथ कोठारे हे हैदराबादमध्ये दाखलही झाल्याचं वर्तुळात बोललं जात आहे.
यानंचर येत्या काही दिवसात मालिकांचे नवे कोरे एपिसोड्स येणार असल्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे.

#lokmatcnxfilmy #CoronaVirus #Lockdown #Serialshooting
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber